*लातूर जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय सदस्य पदी काँग्रेसचे युवा नेते या.अभयदादा साळुंके यांची निवड*
निलंगा :-(प्रतिनिधी) लातूर जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय सदस्य पदी लातूर जिल्ह्याची मुलूख मैदानी तोफ काँग्रेसचे युवा नेते मा.अभयदादा साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.त्यामुळे निलंगा तालुक्यातील दादांचे समर्थक खूप आनंदी झाले आहेत."हे लातूर हाय पिल्लू" या वाक्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले, सर्व महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. तगरखेडा गावातील सरपंच केवळाबाई सुर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार, ग्रामपंचायत सदस्य यांनी युवा नेते मा. अभयदादा साळुंके यांचे हार्दिक स्वागत, अभिनंदन केले.आम्ही तगरखेडकर, चांदनी चौक मित्र परिवार, मा.अभयदादा साळुंके समर्थक इ ग्रूप तर्फे दादांचे स्वागत अभिनंदन करण्यात आले.



Post a Comment
0 Comments