Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*लिंगायत महासंघाच्या लातुर जिल्हाउपाध्यक्षपदी दयानंद मठपती सरांची निवड*

 *लिंगायत महासंघाच्या लातुर जिल्हाउपाध्यक्षपदी दयानंद मठपती सरांची निवड.*





लातूर :-(प्रतिनिधी)  लिंगायत महासंघाच्या लातुर  जिल्हाउपाध्यक्षपदी दयानंद मठपती तगरखेडकर यांची निवड आज लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार सर यांनी केली असल्याचे लिंगायत महासंघाचे सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.

लिंगायत महासंघ लातूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी काम करत आहे .समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठी, समाजाची धार्मिक सामाजिक ,आर्थिक स्थिती मजबुत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.लिंगायत समाजाला पुर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी निष्ठावान समाजसेवकाची एकजुट करण्याचा प्रयत्न लिंगायत महासंघ करत आहे. याचाच भाग म्हणून दयानंद मठपती,तगरखेडकर यांची लातूर  जिल्हाउपाध्यक्षपदी निवड  करण्यात आली असल्याचे जिल्हासरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले. दयानंद मठपती हे निलंगा तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक असून सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रभागी असतात.त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.अतिशय मनमिळावू व सर्वांना सोबत घेवून चालणारे अशी त्यांची लातूर जिल्ह्यात ओळख आहे.या निवडीबद्दल लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ काशिनाथ राजे, जिल्हा संघटक नागनाथअप्पा भुरके जिल्हासरचिटणीस चंद्रकांत कालापाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे,निलंगा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळूंके,संजय कदम,विश्वनाथ स्वामी (सावळे),ञ्यंबक स्वामी,मन्मथ स्वामी,निळकंठ स्वामी,श्रीकांत स्वामी,उस्तुरीचे सरपंच मल्लिकार्जून दानाई,डाँ मल्लिकार्जून शंकद,अविनाश बिराजदार,कोराळीकर,देवेंद्र कोराळे,बस्वराज पाटील,शिवशरण पाटील,उमेश बडूरे, लक्ष्मण कांबळे,सुभाष डावरगावे,बस्वराज राघो,प्रभात पाटील आदीनीं अभिनंदन केले आहे.



Post a Comment

0 Comments