*चेअरमन श्री अरुणजी सोळूंके यांच्या वाढदिवसानिमीत्त,तगरखेडा येथील 'बौध्द विहार' प्रकाशाने उजळले.*
*निलंगा तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा जिल्हा परिषद,लातूरचे स्विकृत सदस्य (शिक्षण विभाग) श्रीमान अरुण भास्करराव सोळूंके यांच्या वाढदिवसानिमीत्त तालुक्यात त्यांच्या मिञमंडळीकडून व शिक्षक बांधवांकडून 'सामाजिक उपक्रम' राबविले जात असतात...
तगरखेडा येथील रहिवासी व निलंगा शिक्षक पतसंस्थेचे संचालक श्री दयानंद मठपती यांनी तगरखेडा येथील 'बौध्द विहारास' चार एल.ई.डी.ट्युब लाईट' भेट दिले.बौध्द विहारातील फँन व लाईटची किरकोळ दुरुस्ती करुन दिली.दयानंद मठपती यांनी दिलेल्या ट्युब लाईटमुळे तगरखेडा येथील 'बौध्द विहार' प्रकाशाने न्हाऊन निघाले आहे.दयानंद मठपती यांनी आपल्या जिवलग मिञाच्या 'वाढदिवसानिमीत्त' आगळा-वेगळा उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा पाडला आहे.... वाढदिवसानिमीत्त राबविलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे निलंगा तालुक्यात कौतुक होत आहे.....*




Post a Comment
0 Comments