*लिंगायत महासंघाच्या'वतीने 'स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी' श्री मिलिंदजी लातूरे यांना निवेदन*
निलंगा :-( प्रतिनिधी)तगरखेडा ता.निलंगा जि.लातूर येथील 'लिंगायत समाज स्मशानभूमीला संरक्षक भिंत' (Compound Wall) बांधण्यासाठीचे निवेदन 'लिंगायत महासंघाच्या'वतीने माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान जि.प.सदस्य श्री मिंलिंदजी लातूरे यांना देण्यात आले.तगरखेडा येथील 'लिंगायत स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतींचे २५% काम झाले असून ७५% काम होणे बाकी आहे.संरक्षक भिंत नसल्यामुळे जनावरे स्मशानभूमीत जात आहेत..स्मशानभूमीत अतिक्रमण होऊ शकते,अशा आशयाचे निवेदन तगरखेडा येथील लिंगायत महासंघाचे झुंजार कार्यकर्ते श्री बस्वराज राघो,श्री प्रभातकुमार पाटील,श्री मंगेश हरंगूळे,श्री गजानन येरोळे,श्री कपिल फुलारी व श्री पवन पाटील यांनी दिले.याप्रसंगी 'लिंगायत महासंघाचे' जिल्हा उपाध्यक्ष श्री दयानंद मठपती हेही उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा स्तरावर सातत्याने पाठपुरावा करुन 'तगरखेडा येथील लिंगायत स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचा (Compound Wall) प्रश्न तात्काळ सोडवू,असे आश्वासन श्री मिलिंदजी लातूरे यांनी दिले.



Post a Comment
0 Comments