*वसुंधरारत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न*
लातूर:-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रतला पहिला 'वृक्षरूपी गणपती बाप्पा' 2017 मध्ये लातुरात साकारला. याची दखल महाराष्ट्रभर घेण्यात आली.
गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळांना सोबत घेऊन वृक्ष चळवळ उभारली.
लातूर शहर, जिल्ह्यातील वृक्ष लागवड आणि संवर्धन करणारे गणेश मंडळ, पक्षी-प्राणीमित्र, वैद्यकीय सेवेत वाहून घेतलेले मान्यवर, गणेशोत्सव काळात रात्रंदिवस सेवा देणारे पोलीस अधिकारी बंधू-भगिनी, विद्युत पुरवठा करणारे कर्मचारी, गणेशोत्सव काळात 10 दिवस मल्लखांबचे मोफत प्रशिक्षण देणारे मल्लखांबपट्टू या मान्यवरांचा बंसल क्लासेस आणि वसुंधरा प्रतिष्ठानने 'वसुंधरारत्न' पुरस्कार 2022 देऊन सन्मान केला.
कोविड काळात उपमहापौर म्हणून लातूरकरांची सेवा केल्याबद्दल श्री.चंद्रकांत बिराजदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राजीव गांधी चौक परिसरात आलेल्या सर्व गणेश मंडळ अध्यक्ष यांना मंचावर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला.
लातुरात सर्वात उंच फायबरची मूर्ती साकारणारे लातूरचा राजा गणपती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष शाम जाधव यांचाही 'वसुंधरारत्न' पुरस्काराने गौरव करण्यात आला.
विशेष म्हणजे, वसुंधरा प्रतिष्ठानने 2015 सालात सुरू केलेल्या 'वृक्षोत्सव हाच गणेशोत्सव' या अभियानात सहभागी होऊन वृक्ष लागवड आणि संवर्धन करणाऱ्या गणेश मंडळांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याला लातूरचे माजी उपमहापौर श्री.चंद्रकांत बिराजदार, मनपाचे माजी बांधकाम सभापती श्री.गिरीश पाटील, श्री.मनोज चिखले पाटील, श्री.कमलाकर कुलकर्णी काका यांच्यासह बंसल आणि वसुंधरा टीम उपस्थित होते.
चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी हा हेतूने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.
आलेल्या सर्व गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली.
विशेष म्हणजे, वसुंधरा टीमने रात्री उशिरा राजीव गांधी चौक ते आदर्श कॉलनी या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने पडलेल्या पाणी बॉटल्स, महाप्रसाद खाऊन टाकलेले प्लेट्स स्वतः उचलून स्वच्छता केली.
गणेशोत्सव काळात आलेल्या भक्तांना फळझाड आणि कापडी पिशवी भेट देऊन पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिक बंदी याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
गणेशोत्सव काळात 10 दिवस मोफत सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. माधवबाग क्लिनिक यांच्या सहकार्याने 58 रक्ताच्या चाचण्या अत्यंत सवलतीच्या दरात करून डॉक्टर यांचा वैद्यकीय सल्ला मोफत देण्यात आला.
प्रतिष्ठानचे सदस्य रामलिंग बिडवे यांच्या पुढाकाराने 10 दिवस शालेय विद्यार्थ्यांना मल्लखांबचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.
10 दिवस विविध उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment
0 Comments