औराद शहाजानी:-( प्रतिनिधी)
देवणी येथील दोन तरुण ट्रॅक्टर मध्ये पेरणी यंत्र घेऊन गावाकडे जात असताना अचानक नदीला पूर आल्यामुळे चारही बाजूंनी पाणी साचल्याने जवळपास एक रात्र अंधारात काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपत्ती व्यवस्थापन यांनी रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून दोघांना बाहेर काढण्यात आले यश.
राहुल इंग्रजीत गवळी राहणार वेळेगाव तालुका देवणी व महल खुशालगिर गिरी देवणी हे औराद येथील भिंगोले यांचे जुने पेरणीयंत्र खरेदी केलेले घेऊन जात आसताना सिमावर्ती भागातील तेरणा व मांजरा नदीच्या संगमावर औराद - वांजरखेडा जाणाऱ्या रस्त्यावर शिवपुत्र आगरे यांच्या शेताजवळ गेल्यानंतर नदीच्या दोन्ही बाजुला पाणी रस्त्यावर वाहत आसल्यामुळे अडकुन पडले आणी एक रात्र पुर्ण अंधारात व चारही बाजुंनी पाणी आसल्यामुळे आणी तेथे दिगंबर माने या शेतकऱ्याचे पत्र्याचे शेडमध्ये रात्र राहील्यानंतर सकाळी शिवपुत्र आगरे हे शेताकडे गेले आसल्यामुळे शेतात ट्रक्टर व माणसे दिसताच त्यांनी प्रशासनाला सर्व घटना कळविले व तेव्हा औराद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त लावत अपत्ती व्यवस्थापन चे लोक येईपर्यंत थांबून राहीले व सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तलाठी बालाजी भोसले व रेश्क्यु पथक तेथे बोटीसह उपस्थित झाले आणी लगेच या दोघांना पाण्यातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
या पुराच्या पाण्यात त्या ठिकाणी या दोघांसह शेताची राखण करणारे एक कुत्रा सुध्दा सुखरुप पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या रेस्क्यू आँपरेशन मध्ये गंगाधर खरोडे यांच्या नेतृत्वाखाली विशाल सांडोर , सोमनाथ मादळे , सचिन कांबळे आणी स्थानिक पत्रकार अमोल ढोरसिंगे यांनी रेस्क्यू आँपरेशन पार पाडले यावेळी सपाेनि संदीप कामत , तलाठी बालाजी भाेसले , तलाठी विशाल केंचे पोलीस हवालदार श्रीनिवास चिटबाेने , धनराज हरणे , मारुती कचवे , रवींद्र काळे , लतीफ सौदागर आदी पोलीस व महसुल प्रशासन कर्मचारी उपस्थित हाेते. या अपत्ती व्यवस्थापनाचे संपुर्ण मार्गदर्शन तहसीलदार घनश्याम अडसूळ केले व सर्व सहकारी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments