Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद*
लातूर:-(प्रतिनिधी)
 उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय यांच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवानिमित्त आज ग्रंथदिंडी काढण्यात आली. जुने जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालेल्या या ग्रंथदिंडीत विद्यार्थी, साहित्यप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आत्मकथनकार सुनीता अरळीकर यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली.

उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, धनंजय गुडसूरकर, मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष जयद्रथ जाधव, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकिळे यावेळी उपस्थित होते.

ग्रंथदिंडीमध्ये राजमाता जिजामाता विद्यालय, देशिकेंद्र विद्यालय, केशवराज विद्यालय आणि सानेगुरुजी विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी संत-महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. तसेच या विद्यालयांच्या लेझीम पथकही ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरु झालेली ग्रंथदिंडी छत्रपती शिवाजी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथे आल्यानंतर समारोप झाला.

Post a Comment

0 Comments