लातूर : -( प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले असून या धक्क्याचे केंद्र हे देखील पुन्हा किल्लारी परिसर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे
हा भूकंप सौम्य प्रमाणात २.४ रिस्टर स्केल नोंदवण्यात आला असल्याचेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले आहे. शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी दोन वाजून सात मिनिटांनी हे धक्के किल्लारी आणि परिसरात जाणवले.
सुमारे पाच किलोमीटरचा परिसर या धक्क्यामुळे हादरला. या भूकंपामुळे किल्लारी मध्ये झालेल्या १९९३ मध्ये भूकंपाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. एकेकाळी महाराष्ट्रच नाही तर देशाला हादरवणा-या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. १९९३ मध्ये सप्टेंबर महिन्यात ३० तारखेला प्रलयंकारी भूकंप झाला होता.
---------------------+--------------------------
*किल्लारी परिसरात सौम्य भूकंप*
लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात दि. 19 नोव्हेंबर, 2022 (शनिवार) रोजी रात्री दोन वाजून सात मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली असून याचे केंद्रबिंदू हे किल्लारी परिसर आहे. रिश्टर स्केल मध्ये त्याची तीव्रता 2.4 इतकी नोंद झाली आहे.
तीव्रतेच्या आधारावर सदर 2.4 भूकंपाचे वर्गीकरण सूक्ष्म या कॅटेगिरी मध्ये येते. या भूकंपामुळे परिसरात कसलेही नुकसान झाले नाही. परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
*-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय लातूर*

Post a Comment
0 Comments