Home*न्यु डिजिटल मीडियाच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदी छाया धुमाळ तर निलंगा तालुका अध्यक्षपदी द्रोणाचार्य कोळी यांची निवड* *न्यु डिजिटल मीडियाच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदी छाया धुमाळ तर निलंगा तालुका अध्यक्षपदी द्रोणाचार्य कोळी यांची निवड* shivajinirmnale@gmail.com November 23, 2022 0 *न्यु डिजिटल मीडियाच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदी छाया धुमाळ तर निलंगा तालुका अध्यक्षपदी द्रोणाचार्य कोळी यांची निवड* *न्यु डिजिटल मीडियाच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदी छाया धुमाळ तर निलंगा तालुका अध्यक्षपदी द्रोणाचार्य कोळी यांची निवड* लातूर:-(प्रतिनिधी)23 नोव्हेंबर रोजी न्यू डिजिटल मीडिया फाऊंडेशन च्या निलंगा तालुका अध्यक्ष पदी कोकळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांची तर महाराष्ट्र राज्य महीला अध्यक्षा म्हणून छाया धुमाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.सामजिक, व पत्रकारिता क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन त्यांची लातूर येथील न्यू डिजिटल मीडिया फाऊंडेशन संघटनेने निवड केली आहे.त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे. यावेळी न्यू डिजिटल मीडिया फाऊंडेशन संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश नरसिंगे, उपाध्यक्ष रवि बिजलवाड, कोषाध्यक्ष संतोष सोनवणे, जिल्हा अध्यक्ष रमण बेंबडे, लातूर शहर अध्यक्ष लक्ष्मण लंगर, लातूर शहर महिला अध्यक्षा रेणुका बोरा, शुभांगी राऊत, विशाल सुर्यवंशी राम रोडगे आणि संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. न्यू डिजिटल मीडिया संघटनेच्या या निवडी अतिशय महत्त्वपूर्ण समजली जात आहे.या संघटनेने डिजिटल मीडिया क्षेत्रातील अनेक पत्रकारांना त्यांच्या समस्या, त्यांच्यावर होणारे बेकायदेशीर हल्ले, ग्रामीण परिसरातील पत्रकारांना अनेक अपमानास्पद वागणूक दिली जाते आहे, यासारख्या अनेक समस्या शासन स्तरावर सोडवण्यासाठी व पत्रकाराना शासनाच्या आरोग्य व अनेक सुविधा, त्यांचे घटनात्मक अधिकार याविषयी संघटना कार्य करणार आहे. संघटनेचे ध्येय धोरण आणि कार्य व उद्देश याविषियी चर्चाही करण्यात आली.ग्राउंड लेवलवर डिजिटल मीडिया क्षेत्रातील प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या पत्रकारांनी न्यू डिजिटल मीडिया संघटनेमध्ये पदार्पण करावे असे आवाहन यावेळी संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश नरसिंगे यांनी केले आहे. Newer Older
Post a Comment
0 Comments