निलंगा: (प्रतिनिधी)
शेषगिर शंकरगिर गिरी, मौजे.नणंद, तालुका. निलंगा, जिल्हा. लातूर येथील रहिवासी असून 06 जून 2021 रोजी तळ्याच्या जवळ म्हशी चारत असताना विद्युत तार तुटून विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्यामुळे त्यांची म्हेस जाग्यातच दगावली होती. हे कुटुंब अत्यंत गरीब असून दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असत. अशा कुटुंबाला महावितरणकडून आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही माहिती कळताच युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन, रुग्णालय व महावितरण यांना कळवून व आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने सविस्तर अहवाल तयार करून महावितरण कार्यालयाला सादर केला व सततच्या पाठपुराव्यामुळे महावितरण कार्यालयाकडून आज शेषगीर शंकरगिरी गिरी यांना 33 हजार रुपयांचा धनादेश मिळाला. याबद्दल युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी सतत पाठपुरावा करून गरीब कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment
0 Comments