लातूर :-(प्रतिनिधी)
लातूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना इंग्लिश विषयाचे धडे देणारे हाडाचे शिक्षक गोरगरीब विद्यार्थ्यांचे घडवणारे आदर्श शिक्षक तथा राज्य शिक्षण बोर्डाचे माजी सदस्य भगवान सिंह उमरावसिंह राजपूत वय वर्ष ७८ राहणार लातूर यांचे मुंबई येथे लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सोमवारी दुःखद निधन झाले त्यांच्यावर मंगळवारी २० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता लातूर येथील मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होेत आहे
दिवंगत भगवानसिंह राजपूत गुरुजी हे लातूर शहरातील सावेवाडी भागात इंग्रजी विषयांचे क्लास चालवायचे त्या काळात शहरातील व ग्रामीण भागातून विद्यार्थी त्यांच्याकडे शिकण्यासाठी यायचे मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत विद्यार्थ्याना त्यांनी शिकवले त्यांच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थी घडले वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत आहेत राजपूत गुरुजी हाडाचे शिक्षक असले तरी त्यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग राहायचा अनेक संस्था , शैक्षणीक क्षेत्रातील नामवंत संस्थेच्या विविध कार्यक्रमात सहभागी व्हायचे राज्य शासनाचा,विविध संस्थाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव केला आहे राज्य शासनाच्या उच्च शिक्षण बोर्डाचे ते संचालक होते
लातूरचे संजय गांधी निराधार योजनेचे माजी चेअरमन अमर राजपूत व उद्योजक अजय राजपूत यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात दोन मुले, १ मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे
*भगवानसिंह राजपूत यांच्या निधनाने देशमुख कुटुंबाकडून शोक संदेश*
दिवंगत भगवानसिंह राजपूत गुरुजी यांचे सोमवारी दुःखद निधन झाल्याचे कळताच राजपूत कुटुंबाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या कडून पत्राद्वारे शोक संदेश पाठवून त्यांच्या दुःखात सामील असल्याचे त्यांनी कळवले आहे तसेच शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राजपूत कुटुंबाचे फोन द्वारें सांत्वन केले आहे

Post a Comment
0 Comments