Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*स्पर्धेच्या युगात ध्येय ठरवून वाटचाल करत राहा- डॉ. उमाकांत जाधव*

 

स्पर्धेच्या युगात ध्येय ठरवून वाटचाल करत राहा- डॉ. उमाकांत जाधव 

श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालकमेळावा संपन्न

लातूर:-(प्रतिनिधी)

श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेथे आयोजित पालक मेळाव्याचे उद्घाटन व मार्गदर्शक  म्हणून डॉ. उमाकांत जाधव सर, प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजय लखनगिरे  सर तसेच श्रीमती ठाकुर मॅडम उपनिरीक्षक लातूर ग्रामीण, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. लोखंडे सर व पालक प्रतिनिधी वाघमारे, खंडागळे तसेच महिला पालक म्हणून शिंदे सरीता व संस्थचे अध्यक्ष श्री. प्रतापराव शिंदे हे उपस्थित होते. पालक मेळाव्यास मार्गदर्शन करताना डॉ उमाकांत जाधव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना . ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेचे युगात  ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दैवत मानून निष्ठेने विद्यादानाचे पवित्रकार्य करावे त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी  चांगले धडे द्यावेत. स्पर्धेत टिकण्यासाठी कशी वाटचाल केली पाहिजे. याविषयी विवेचन करून नियमित अभ्यास हेच यशाचे गमक आहे असे त्यांनी सांगितले प्रमुख अतिथि विजय लखनगीरे सरानी मनोगत व्यक्त करताना सर्व पालकांना विनंती की आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवा.  नाहीतर, भविष्यात बिघडतील व नंतर ते तुम्हाला सुद्धा विचारणार नाहीत  त्याच्या केसांची ठेवण व्यवस्थित असावी. साधी ठेवन असावी. उगीचच वेगवेगळे कट मारू नका शालेय गणवेश व्यतिरिक्त इतर ड्रेस वर जास्त खर्च करू नका दादाचा मुलगा भाऊचा मुलगा या उपाध्या घरीच ठेवून फक्त विद्यार्थी म्हणूनच शाळेत पाठवून द्या.अँड्रॉइड मोबाईल पासून मुलांना दुर ठेवा.मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पुरवू नका. मुलांचे मित्र तपासा सर्व मित्रांची माहिती करून घ्या. मुलगा - मुलगी शाळेत जाण्यासाठी घरुन निघतात,खरच शाळेत जातात का याची वरचेवर शिक्षकांना फोन करून शहानिशा करत चला असा सल्ला दिला याप्रसंगी सत्कारमूर्ती व मार्गदर्शक ठाकुर मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना पूर्वी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षा होती म्हणून ती पिढी सुधारली आता शिक्षकांनी थोडे जरी काही झाले तरी पालक शिक्षकांशी वाद घालतात. व आमची खूप ओळखी आहे .आमची चलती आहे .असा शिक्षकाला दम देतात. तसे करू नका शिक्षकांना शिक्षकाचा योग्य तो मान द्या तुमची मुलं सुधारतील हा शिक्षकाचा प्रामाणिक उद्देश असतो. कृपया गैरसमज करून घेऊ नका नाही तर तुमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येईल हा सल्ला देवून सावित्रीजिजाऊंचा वारसा ठेवून मार्गक्रमण करा असे सांगितले कार्यक्रमाचे आभार श्री अभंगे सर यांनी मानले
  या कार्यक्रमासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व श्रीराम माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी वृंदानी सहकार्य  केले.

Post a Comment

0 Comments