Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*कादंबरीची कार्यशाळा...*

कादंबरीची कार्यशाळा...
लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कादंबरीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन सुप्रसिद्ध समीक्षक डॉ.महेश खरात यांनी केले.यावेळी प्रा.डॉ .शेषराव मोहिते सर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर प्राचार्य डॉ.गव्हाणे सर अध्यक्षस्थानी होते. 

  ' माझ्या कादंबरीची निर्मितीप्रक्रिया ' या विषयावरच्या सत्रात मी  बोलण्यासाठी निमंत्रित होतो. माझ्या सोबत मांडणी करायला मित्रवर्य संतोष जगताप लोणविरे होते तर कथाकार व कादंबरीकार प्रा.सुरेंद्र पाटील सर यांनी त्या सत्राचे अध्यक्षीय स्थान भूषविले. कार्यशाळेला डॉ.जयद्ररथ जाधव सर, डॉ.ज्ञानदेव राऊत सर , डॉ.हनुमंतराव जाधव सर आणि माझा महाविद्यालयीन जीवलग मित्र प्रा.बालाजी भंडारे या सगळ्यांनी हजेरी लावल्याने  त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा झाल्या.लातूरच्या या मित्रांच्या आदारातिथ्याने अगदी भारावून गेलो.

कार्यक्रमाचे लक्षवेधीरूप म्हणजे सभागृह प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले होते.शेवटी बाहेर खुर्च्या टाकून बसायची व्यवस्था करावी लागली. खूप दिवसानंतर एका साहित्यिक कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची एवढी मोठी गर्दी बघायला मिळाली. याचे सगळे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गव्हाणे सर व त्यांचा कृतीशील स्टाफ व मराठी विभागाला जाते. विभागाचे प्रमुख डॉ संभाजी पाटील सर स्वतःचे मोठेपण विसरून प्रत्येक गोष्टीकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष देत होते. संपूर्ण विद्यार्थी जेवल्याशिवाय तेथील एकही प्राध्यापक जेवत नाही, हे कौतुकास्पद आहे.
पाटील सर ,आपले महाविद्यालय खरेच सर्वोत्तम आहे.हा अनुभव,आपली नम्रता आणि विद्यार्थ्यांचे उदंड प्रेम सोबत घेऊन औरंगाबादला निघालोय.

रमेश रावळकर 

Post a Comment

0 Comments