Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*गुत्तेदार व अभियंतावर देयेची साथ दाखवणारा शुक्राचार्य नेता कोण

*गुत्तेदार व अभियंतावर देयेची साथ दाखवणारा शुक्राचार्य नेता कोण*

उदगीर येथे होत असलेला रोड काम निकृष्ट दर्जाचा!

*देवकरच्या दयेमुळे लवरकरच होतील आंदेचे वांदे!*

सा.बां. प्रादेशिक कार्यालयासमोर उपोषण!

उदगीर (प्रतिनिधी)

लातूर जिल्ह्यातील:बी.आर.आंदे कॉन्ट्रॅक्शन या कंपनी मार्फत झालेले व चालू असलेले रोड काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. 1)अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद ते वायगाव पाटी 2)जळकोट तालुक्यात घोणसी ते आतनूर डांबर रोड काम 3)उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जाकेर हुसैन चौक व जाकेर हुसैन चौक ते तोंडार पार्टी पर्यंत सिमेंट रोड व डीव्हायडर व रोडच्या दोन्ही बाजूने साईट पट्ट्याचे काम मोजमाप पुस्तके प्रमाणे होत नसून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून कोट्यावधी रुपयाची शासनाची फसवणूक करीत असल्याने सदर कामाची गुण नियंत्रण पथका मार्फत चौकशी करून संबंधित शाखा अभियंता देशपांडे, उपविभागीय अभियंता लक्ष्मन देवकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करावे व बी.आर. आंदे कॉन्ट्रॅक्शन कंपनीची मान्यता रद्द करून काळया यादीत टाकावे या मागणीसाठी  दि.19 /12 /2022 पासून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड समोर झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी, अल्पसंख्यांक मराठवाडा अध्यक्ष शेख अजीम यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments