Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*गट विकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली.*


गट विकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली..      

अनेक कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती करुन थकविले वेतन.


प्रतिनिधी :- 
      निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील ग्रामपंचाय असुन अडचण बनली आहे. नाव मोठे आणी लक्षण खोटे असा कारभार सुरु आहे. गेल्या अनेक तीन वर्षांपासून येथील ग्रामपंचायत अनेक भ्रष्टाचारांच्या व बनावट नमुना नंबर ८ च्या तक्रारी च्या माध्यमातून सतत चर्चेत आसतानाही आता कर्मचाऱ्यांची पोटमार करण्यावर भर दिसून येत आहे. याची सविस्तर माहिती अशी की, या ग्रामपंचायतला नियमानुसार फक्त सहा कर्मचारी नेमनुक करण्याचे अधिकार आहेत पण  येथे हे कर्मचारी असुन सुध्दा या ग्रामपंचायत ने वरीष्ठांची परवानगी न घेता जवळपास पंचेचाळीस कर्मचारी रुजु करुन घेतले आहेत. 
       येथील ग्रामपंचायत सेवक दत्ता कांबळे याला सेवक म्हणून घेण्यात आले होते. पण काम होऊन हि सरपंच ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार सुरू असून ग्रामपंचायत सेवकांना वेतन न देता उलट सुलट उत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
         संबधीत कर्मचाऱ्याने गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन एक तर मला माझा रोजगार द्या अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशी मागणी केली होती. त्यामुळे पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी बळवंते यांनी चौकशी करुन चौकशी अहवाल दिल्यानंतर दत्ता कांबळे या कर्मचाऱ्याला थकित १०,०००/- रुपये मानधन देण्यासाठी आदेश दिले होते. 
       दत्ता कांबळे या कर्मचाऱ्याला मानधन देण्यासाठी आदेश देऊन दोन महिने झाले तरी येथील ग्रामपंचायत चे सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे जाणून-बुजून मानधन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे या कर्मचारी व्यतिरिक्त आजही अनेक कर्मचारी कामावर आहेत अशा अनेक कर्मचाऱ्यांची मानधन थकलेले आहे

Post a Comment

0 Comments