Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन*

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

• ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

*लातूर,दि.28(जिमाका):* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष यानिमित्त 30 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन मेळाव्यासाठी लातूर जिल्ह्यातील आस्थापना आणि उद्योजकांनी एकूण 80 पदे अधिसूचित केली आहे. यामध्ये लातूर येथील जय इंडस्ट्रीने 30 पदे अधिसूचित केली असून यासाठी दहावी किंवा आयटीआय (वेल्डर, फिटर, टर्नर) पात्रता राहील. यशस्वी अकॅडेमी फॉर स्कीलने एकूण 30 पदे अधिसूचित केली असून यातही बी. काम, एमएस-सीआयटी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. डॉमिनोज पिझ्झा लातूर या आस्थापनेने 20 पदे अधिसूचित केली असून त्यासाठी इयत्ता दहावी, वाहन चालविण्याचा परवाना अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे

ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी अधिसूचित केलेल्या सर्व रिक्तपदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 30 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पसंती क्रमांकांनुसार अर्ज करावा. लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रामध्ये किंवा 02382-299462 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा. सु. मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments