ज्येष्ठ कवी योगीराज माने*
लातूर :-( प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांनो! तुमच्या सर्वांगीण विकासासाठी तुमचे आई-वडील सातत्याने कष्ट करतात आणि आपल्याला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देतात त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे स्मरण करून आपली शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी योगीराज माने यांनी बोलताना व्यक्त केले.
महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, लातूर द्वारा वार्षिक स्नेहसंमेलन २०२३ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मन्मथप्पा लोखंडे हे होते तर विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संचालक अॅड.श्रीकांतप्पा उटगे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे, संयोजन समिती सदस्य डॉ.श्रद्धा मिसर (अवस्थी), प्रा.वनिता पाटील, प्रा.रवींद्र सुरवसे आणि प्रा.उदय धनुरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर संगीत विभागातील प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा.गोविंद पवार आणि विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
पुढे बोलतांना कवी योगीराज माने म्हणाले की, आपल्याला जीवनात यश संपादन करायचे असेल तर आपण नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. आपल्या जीवनाला आपल्या आई-वडिलांना समवेत आपले शिक्षक आकार देतात. आज वृद्धाश्रमाचे लोन हे पसरू लागले आहे मात्र आपण त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवू नये. यावेळी जिजाऊच्या पोटी शिवाजी जन्म घ्यावा, गावाची कविता, बुढापा महान होता है!, मला अजून आठवतंय माझं खेड्यातलं घर, बाप माझा, लव स्टोरी लव स्टोरी असते थोडसं प्रॅक्टिकल आणि थोडंस थिअरी असते, वावरात राबणारी माझी माय साधी भोळी, चिमणी आणि कावळा संवाद, चला सीमेवर जाऊ.... अशा विविध समाज प्रबोधनपर कवितांनी महाविद्यालयातील प्रमुख अतिथी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची त्यांनी मने जिंकली. विविध कविता सादर करून त्यांना त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेतले. आजचा कार्यक्रमाच्या माध्यमातून कुणी ना.धो.महानोर तर कुणी बहिणाबाई बनेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मनोगतपर मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश मौने म्हणाले की, महाविद्यालयांमध्ये बौद्धिक गुणी विद्यार्थ्यांसोबत सांस्कृतिक व कला क्षेत्रात गुणी असणारे विद्यार्थी असतात. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा असा सातत्याने प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना परीक्षा व विविध शैक्षणिक कार्यातून थोडा विरंगुळा मिळावा आणि जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे याला आपण सर्वांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे सचिव मन्मथप्पा लोखंडे म्हणाले की, कविता ही आपले जीवन घडविते. आपण आपले आई-वडील आणि नातेवाईक यांचे स्मरण केले पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमाचा ओलावा असला पाहिजे. कवी योगीराज माने यांना आपण पण चांगली सकारात्मक साथ दिली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.
यावेळी शुभेच्छ्यापर मनोगत ज्येष्ठ संचालक अॅड.श्रीकांतप्पा उटगे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कल्पना गिराम, डॉ.टि.घन:श्याम यांच्यासह सोमवसे पूजा, विजय चक्रे, योगेश नागरगोजे, निकिता मोरे आणि चोथवे दिपाली यांनी केले तर आभार प्रा.वनिता पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूत्रसंचालन समिती, आनंद नगरी समिती, परीक्षक समिती, पुष्पहार समिती, स्टेज डेकोरेशन समिती, विविध गुणदर्शन समिती, शेलापागोटे समिती, प्रवेशद्वार शिस्तपालन समिती, बैठक व्यवस्था समिती, प्रसिद्धी समिती, भोजन व्यवस्था समिती, भोजन वाटप समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments