Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्‍तव्याबद्दल भाजपायुमोकडून माजी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन!!*

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्‍तव्याबद्दल भाजपायुमोकडून माजी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !!

लातूर:-( प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे वादग्रस्त वक्‍तव्य करून तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत. छत्रपती संभाजी राजेंच्या धर्मनिष्ठेवर बोट ठेवत त्यांच्या धर्मवीर उपाधीलाच आपल्या राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक विरोध करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी विक्रांतदादा पाटील, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथजी मगे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून व त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत तीव्र निषेध व्यक्‍त करण्यात आला. 

ज्या औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर 40 दिवस अगणित अत्याचार करून त्यांची क्रुरपणे हत्या केली. ज्या औरंगजेबाने हजारो देवी-देवतांची मंदिरे उद्ध्वस्त केली, आया-बहिणीवर अत्यावर करून जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे काम केले. त्या धर्मद्वेष्ट्या औरंजेबाच्या विरोधात शेवटच्या श्‍वासापर्यंत झुंज देत आपल्या प्राणंची आहुती दिली पण आपला धर्म सोडला नाही असे आमचे अराध्यदैवत धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वादग्रस्त वक्‍तव्य करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचे काम केले. परंतु छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते व ते कायम धर्मवीरच राहतील असा ठाम विश्‍वास व्यक्‍त करीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर जिल्ह्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने अजित पवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्‍तव्याचा जाहीर निषेध करून त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी या आंदोलनाला भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अ‍ॅड.गणेश गोमजगुंडे, संतोष ठाकूर, सागर घोडके, जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र बोकण, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, युवती आघाडी प्रमुख पुनम पांचाळ, मंडलाध्यक्ष अ‍ॅड.हरिकेष पांचाळ, कार्यालय प्रमुख आकाश बजाज, सोशल मिडीया जिल्हा संयोजक आकाश जाधव, चिटणीस संतोष तिवारी, राहूल भूतडा, सुनिल राठी, आदित्य फफागिरे, आकाश जाधव, महादेव पिटले, ईश्‍वर सातपुते, आकाश पिटले, शुभम माळवदे, गौरव यादव, अभिजीत शिंदे, निखील शेटकार, कृष्णा सारगे, सुरज शिंदे, प्रेम चव्हाण, अजय जाधव, ओम ढेकरे, गणेश धोत्रे, गौरव यादव, यश इटकर, प्रशांत कालापुरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करावे
- अजितसिंह पाटील कव्हेकर

छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी हिंदू धर्माचेच रक्षण केले असल्याचे ऐतिहासिक पुरावे जगजाहीर आहेत. अगदी त्यांनी मृत्यू स्वीकारला परंतु धर्माला अंतर दिले नाही. त्यांना इतिहासापासूनच धर्मवीर या नावाची ओळख मिळालेली आहे. त्यांचे हे अद्वितीय कार्य आहे. याची जाणीव न ठेवता कुठलाही अभ्यास न करता त्यांच्याविरोधी वादग्रस्त वक्‍तव्य केले जात आहे. पंरतु त्यांच्या कार्याचा आदर्श पुढच्या पिढीलाही अवगत व्हावा, यासाठी लातूर शहरातील औसा रोडवरील छत्रपती छत्रपती संभाजी महाराज चौकाचे धर्मवीर  छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करावे अन्यथा भविष्यात या विषयासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल असा ईशाराही भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी मनपा उपायुक्‍तांना निवेदनाद्वारे दिलेला आहे.


Post a Comment

0 Comments