*ग्रामपंचायत देणार १० लाखांचा विमा कवच*
निलंगा:
पानचिंचोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गीतांजली हनुमंते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शंभर टक्के ग्रामपंचायत कर भरणा-या नागरिकांसाठी दहा लाख रुपयांचे विमा कवच द्यावे असा ठराव माजी सरपंच श्रीकांत साळुंखे यांनी मांडला त्यावर उपस्थित नागरिकांनी सहमती दर्शवत हा ठराव एक मताने मंजूर केला यावेळी उपसरपंच बब्रुवान जाधव ग्रामपंचायत सदस्य इकबाल मुजावर छायाबाई स्वामी चंद्रकला हनुमंते, रुबिया शेख हर्षदा दिवे आरती कांबळे अनुसया चव्हाण सत्यजित पाटील सिद्धेश्वर कांबळे श्रीमंत जाधव सुकेशनी कत्ते उपस्थित होते.
या व्यतिरिक्त मागील वर्षाचे जमा खर्च नागरिकांना ग्रामसेवक दत्ता पुरी यांनी वाचून दाखवला. त्यास ग्रामस्थांनी मान्यता दिली यावेळी अनेक लोकोपयोगी तसेच गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेले अनेक ठराव घेण्यात आले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, चेअरमन भगवान पाटील, माजी चेअरमन काकासाहेब पाटील, दिलीप पाटील, भगवान भांगे, जलील शेख, संजय जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सिद्धेश्वर जाधव, गुणाजी जाधव, आकाश जाधव, रमेश जाधव, शुभम जाधव, प्रदीप पाटील, मधू दिवे संदिपान जाधव ग्रामपंचायत कर्मचारी हर्षद सूर्यवंशी, बालाजी हनुमंते आशा कार्यकर्तींसह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments