*अवकाळी पावसामुळे ज्वारी व गहू पिकाचे अतोनात नुकसान, तात्काळ पंचनामे करावेत: प्रा. मिरगाळे*
निलंगा:
निलंगा तालुक्यातील अनेक गावात नणंद,गुंजरगा येळनुर, सिदखेड, बेंडगा अनसरवाडा, जामगा, धानोरा, मन्नतपूर, बामणी, माळेगाव, शिंगनाळ, जाऊ येथे आज पहाटे ठीक चार पासून सहा वाजेपर्यंत अवकाळी पाऊस पडल्यामुळे ज्वारी व गहू पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे.त्याचे तात्काळ पंचनामे करावेत असे निवेदन युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे यांनी नायब तहसीलदार धुमाळ यांना केले आहे.
खरीप पिक हातातून गेले असता सावकारांकडून कर्ज काढून रब्बी पिकाची पेरणी केली, हातात काहीतरी पडेल या आशेने शेतकरी राजा वाट पाहत होता पण आजच्या अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत भुईसपाठ झाले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे. गहू व ज्वारीचे पिके भुईसपाट झालेले दिसून येत आहेत. शासनाच्या तोकड्या मदतीने शेतकऱ्याचे काही भागणार नाही तरीपण शेतकऱ्याची अपेक्षा आहे की शासनाने तात्काळ गहू व ज्वारी पिकाचे तात्काळ पंचनामे करून अनुदान द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या संदर्भात युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी निलंग्याचे तहसीलदार व नायब तहशीलदार धुमाळ यांना फोनवरून नुकसानीची कल्पना दिली असता त्यांनी तलाठ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असे सांगितले.

Post a Comment
0 Comments