Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात नारीशक्तीला प्रणाम*



*महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात नारीशक्तीला प्रणाम*

  
    औराद शहाजानी (प्रतिनिधी) : 
येथील महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करून नारी शक्तीला प्रणाम करण्यात आला. राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सोनाली कुंभार यांनी केले. विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांनी भाषण केले. स्त्री शिवाय घर ही संकल्पनाच निरर्थक आहे, घरातील एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण कुटुंब साक्षर होते, मुलगा मुलगी एक समान दोघांना शिकवा छान असे प्रतिपादन बालाजी मरळे यांनी केले. चंद्रकांत वलांडे यांनी समयोचित भाषण केले. 'कोमल है तू कमजोर नही' या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आवडीने जागतिक महिला दिन साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बिराजदार एस.एम तर आभार श्रीमती मोरे एच.व्ही यांनी मानले. मुख्याध्यापक महेबूब लष्करे यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले. याप्रसंगी रमेश थेटे, संजय कुलकर्णी, संदीप मिरगुडे, अंकुश पानढवळे, अल्ताफ पठाण, अभिषक बेळंबे, जगदेवी स्वामी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments