Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद*


जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद


मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
                       9890098685
लातूर(जिमाका) :
 जागतिक महिला दिन व जागतिक स्थूलता दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने महिलांची सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, आशाताई भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, महाराष्ट्र राज्य आयएमएचे डॉ. रमेश भराटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे रॅलीला हिरवी झेंडी दाखवली.

डॉ. प्रशांत माले, डॉ. शुभांगी राऊत, डॉ. श्वेता काटकर, डॉ. श्रीधर पाठक, डॉ. मद्रेवार यावेळी उपस्थित होते.

महिला आज सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहेत. त्यांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. करिअरसोबतच महिलांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी केले.

   सौ आशाताई भिसे, डॉ. शुभांगी राऊत यांनी उपस्थित महीलांना शुभेच्छा दिल्या.

लातूर सायकलिस्ट क्लब, मॉम विथ व्हिलस, सायकल बड्डीज यांनी या  रॅलीचे सहआयोजन करून सहभाग नोंदविला. बाभूळगाव येथील नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘मुलगी वाचवा’ या विषयावर पथनाट्य सादर केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आनंद कलमे यांनी केले. रॅली यशस्वी करण्यासाठी डॉ. सारीका देशमुख, डॉ. प्रशांत कापसे , डॉ. विमल डोळे, सौ. पाठक, श्री. उगले, विकास कातपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत अधिकारी-कर्मचारी यांनी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments