*सावरीतील शाळेत लक्ष्मण टेळे यांचा सेवापुर्ती सोहळा*
मुख्य संपादक -शिवाजी निरमनाळे
9890098685
शेळगी :
निलंगा तालुक्यातील सावरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील सहशिक्षक लक्ष्मण टेळे हे रविवार दि ३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल सावरी ग्रामस्थांच्या व शाळेच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं स. निलंगा गटशिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप सदाशिवराव पवार हे उपस्थित होते. लक्ष्मण टेळे यांच्यासारख्या शिक्षकांची कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिक मेहनत यामुळे आपण निलंगा पॅटर्न निर्माण करू शकलो, खेड्यातील नवीन शिक्षकांनी त्यांच्या कार्याचे अनुकरण करावे असे आवाहन विस्तार अधिकारी संतोष स्वामी यांनी केले. मोहन माकणे, डी. बी. गुंडूरे, नीळकंठ गिरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती लक्ष्मण टेळे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना लक्ष्मण टेळे यांनी सेवा ही कर्तव्य समजून प्रामाणिकपणे केले असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर अरुण सोळंके, संजय कदम, दत्ता साकोळे, दादाराव टेळे, दत्तात्रय सगरे, बबन पाटील, पत्रकार बालाजी मरळे, श्रीमती पवार उपस्थित होते. या निरोप समारंभास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सेवानिवृत्ताचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरादार तर आभार केंद्रप्रमुख जाधव एस बी यांनी केले.

Post a Comment
0 Comments