*पहिल्याच वर्षी JEE निकालात DCP अकॅडमी चे घवघवीत यश.*
ऋषिकेश सतीश माळेगावे या विद्यार्थ्याने 95.9377टक्के गुण प्राप्त करून अकॅडमीतून प्रथम क्रमांक
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
निलंगा:-
नुकत्याच झालेल्या इंजीनियरिंग साठीच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाणारी JEE Main च्या परीक्षेमध्ये डीसीपी अकॅडमी निलंगा मधील सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी दाखवली आहे. यामध्ये ऋषिकेश सतीश माळेगावे या विद्यार्थ्याने 95.9377 टक्के गुण प्राप्त करून अकॅडमीतून प्रथम क्रमांक पटकावले. त्याबरोबरच अकॅडमीतील एकूण सहा विद्यार्थी आयआयटी कॉलेज च्या JEE Advance प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यात ऋषीकेश माळेगावे, समृध्दी माने, मोघे ऐश्वर्या, हर्षल सुरवसे, करण धोत्रे, गजानन विठुबोने या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे अकॅडमीचे डायरेक्टर प्रा. विजय डावरगावे सरांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अतिशय कमी वेळामध्ये निलंगा शहरात डीसीपी अकॅडमी ने उत्तम कामगिरी दाखवत विद्यार्थ्यांना डॉक्टर व इंजिनिअर बनण्यासाठी अचूक मार्गदर्शन करून सर्वाधिक निकाल दिला आहे. हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चामध्ये उत्तम शिक्षण प्राप्त करण्यासाठी डीसीपी अकॅडमी एकमेव ठिकाण ठरले आहे.
प्रा. विजय सरांनी विद्यार्थ्यांना आवाहन करत म्हटले की "मोठ्या शहरांमध्ये भली मोठी फीस भरून शिकायचं आणि वैयक्तिक लक्ष देणारे कोणीही नसते अशात दोन वर्षा नंतर समाधानकारक निकाल पण भेटत नाही. याशिवाय कमी खर्चामध्ये तज्ञ शिक्षकांच्या वैयक्तिक मार्गदर्शनाखाली डीसीपी अकॅडमी येथे उत्तम निकाल भेटणार ही शाश्वती आम्ही देतो.

Post a Comment
0 Comments