*भाजपाचे जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवून यशस्वी करावे - संजय कौडगे*
लातूर:-
जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला नववर्षपूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर भाजपाच्या वतीने जनसंपर्क अभियान राबवले जात असून हे अभियान लातूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून यशस्वी करावे असे आव्हान भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी केले.
लातूर शहर आणि ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क अभियान कार्यक्रमातील लोकसभा आणि जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील संयोजक सहसंयोजक व इतर कार्यक्रम प्रमुखांची बैठक भाजपाच्या संवाद कार्यालयात मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेश आप्पा कराड हे होते तर जिल्हा प्रभारी तथा प्रदेश चिटणीस प्रा किरण पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी खासदार सुनील गायकवाड, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, दिग्विजय काथवटे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
30 मे ते 30 जून दरम्यान होणाऱ्या विशेष संपर्क अभियानातील विविध कार्यक्रमाची माहिती देऊन भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नऊ वर्षातील मोदीजींची कामे पोहोचवावीत असे आवाहन कौडगे यांनी केले या बैठकीत किरण पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून अभियानाच्या यशस्वीतेसाठी पूर्वतयारी करण्यात यावी असे बोलून दाखविले प्रारंभी सरचिटणीस संजय दोरवे यांनी बैठकीच्या आयोजना बाबतची माहिती दिली या बैठकीस प्रदेश जिल्हा पदाधिकाऱ्यांसह सर्व अपेक्षित मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment
0 Comments