कृषी विभागाचा सल्ला गावागावात जाऊन शेतकऱ्यांना शून्य मशागतंत्रज्ञानाचे मार्गदर्शन.
लातूर:-
नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय उदगीर अंतर्गत दिनांक 14.6.2023 रोजी गाव हंचनाळ तालुका देवणी येथे बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी तंत्रज्ञाचा अवलंबून करणे या उद्देशाने प्रकल्पांतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील काही वर्षात हवामानातील बदल व पर्जन्यातील अनिश्चितता जसे पावसाचे एकूण कमी दिवस कमी वेळेत जास्त पाऊस सरासरीपेक्षा कमी पाऊस पावसाचा तीन आठवड्यापेक्षा जास्त खंड मान्सूनचे उशिरा आगमन व वेळेपूर्वी निघून जाणे गारपीट आवेळी पाऊस या सर्व हवामानातील बदलांमुळे पाणीटंचाईवर पिण्यासाठी, जनावरांसाठी व पिकासाठी व पिकाच्या उत्पादन व उत्पादक घट कृषी उत्पादनाच्या वाढीचा दर घटने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मध्ये नैराश्य ग्रामीण भागाकडून शहरीकडे स्थलांतर होऊ लागले आहे तर परिणाम दिसून येत आहे कर्बमध्ये व आलोवयामध्ये घट व कमी कालावधीत पडणाऱ्या पावसामुळे. या सगळ्यावर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे काळजी गरज आहे त्यासाठी शून्य तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज आहे. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढणार आहे गांडूळ निर्मितीला चालना मिळणार आहे त्यामुळे आपला मशागत करण्याचा खर्च वाचणार आहे.
तसेच पावसाचा खंड पडल्यास पीक तग धरणारे आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा यासंदर्भात माहिती देताना तंत्रज्ञान समन्वय सुदर्शन बोराडे. समूह सहाय्यक सचिन बडवणे यांनी पेरणी करताना बियाण्याला बीज प्रक्रिया करणे ,ऊगव नक्षमता तपासणी करणे,
कडुलिंबाचा उपयोग विविध पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रभावीपणे होतो. कडुलिंबातील रासायनिक घटक कीटकनाशक म्हणून काम करतात. कीड नियंत्रणात लिंबोळीचा वापर केल्याने मित्र कीटकांचे व पर्यावरणांचे नैसर्गिकपणे संवर्धन होते. मित्र कीटक जैव कीडव्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे निंबोळी अर्क तयार करण्याची ही पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. सुदर्शन बोराडे तंत्रज्ञान समन्वय यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे कशाप्रकारे बेड तयार करावेत बेडची कसे करावे या संदर्भात प्रत्यक्ष माहिती प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखवली.या वेळी कृषी मित्र उमेश बिरादार,गावातील शेतकरी अरविंद बिरादार,विजय बिरादार,रामकिशन बिरादार,अशोक पाटील,संजय बिरादार,दत्तात्रय बिरादार,मनोज बिरादार . ई. शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments