*आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नणंद येथे वृक्षारोपण*
निलंगा-
निलंगा तालुक्यातील नणंद येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी निलंगा तालुक्यात अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यातच निलंगा तालुक्यातील नणंद येथे 51 झाडे लावून युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी बालाजी नारायणपुरे, सागर कोरके, जिनेश्वर इंडे, उद्धव जाधव इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments