आधुनिक विचारांचे कृतिशील समाजसुधारक, संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीदिनी भावपूर्ण आदरांजली!
त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अस्वच्छता, अनिष्ट रुढी-परंपरा संपवण्यासाठी जीवनभर कार्य केले. जातीभेदाविरुद्ध लढा दिला. शाळा, धर्मशाळा, नदीवर घाट बांधण्यासाठी मदत केली.
[जन्म: २३ फेब्रुवारी १८७६, कोतेगाव(शेंडगाव); मृत्यू: २० डिसेंबर १९५६ अमरावती ]
संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.


Post a Comment
0 Comments