*माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने महावितरण कंपनीच्या मनमानी, तुघलकी कारभारासंदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना दिले निवेदन*
लातूर:-(प्रतिनिधी)
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलिस मित्र समितीच्या वतीने श्री.दिपक कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष, कमलेश शेवाळे राष्ट्रीय महासचिव, महेश सारणीकर प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र , इद्रीस सिद्दिकी महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली लाॅकडाउन काळापासून महावितरण कंपनीच्या चालू असलेल्या मनमानी, तुघलकी कारभारासंदर्भात जिल्हाधिकारी बि.पी. पृथ्वीराज साहेबांना शिवाजी निरमनाळे जिल्हाध्यक्ष व मारूती माशाळकर कार्याध्यक्ष यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सांगितले की,लाॅकडाउन काळापासून महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल देऊन शॉक दिला व या जास्तीच्या बिलामुळे व मनमानी कारभारामुळे जनसामान्यांच्या माथ्यावर भरमसाठ बिल लादले गेले आहे.किती ग्राहकांचा विजेचा वापर कमी आहे पण त्यांना वीज बिल प्रमाणापेक्षा जास्त येत आहे वीज वितरण कंपनीने ग्राहकांना लुटत आहे.
मागील वर्षी कडक लाॅकडाउन होते आणि त्यातून कुठे आता जनता सावरत आहे तर पुन्हा कडक निर्बंध घातले आहे त्यातच महावितरण कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे जण सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तसेच शेतकऱ्यांना ही अवाजवी बिले आकारणी केली आहेत.रात्री-अपरात्री कधीही महावितरणच्या कर्मचारी शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेला कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करत आहेत तसेच सावकारी पद्धतीने वीजबिल वसुली करत आहेत.शेतकरी आणि सर्वसामान्य जनता हे जास्तीचे बिल भरण्यास असमर्थ असल्यामुळे लाॅकडाऊन पूर्वी जितके बिल होते तितकेच घ्यावी व सावकारी पद्धतीची वसुली थांबवावी.
जनता हवालदिल होऊन त्यांचे अतोनात नुकसान होत आहे तरी यावर आपण शासनाचा दुवा म्हणून शासनाकडे आमची मागणी मांडून लवकरच निर्णय घेऊन सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि महावितरणच्या मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा भविष्यात आमच्या समिती मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरण कंपनीच्या विरोधात व्यापक जनआंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे सांगण्यात आले.यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे जिल्हाध्यक्ष शिवाजी निरमनाळे, कार्याध्यक्ष मारूती माशाळकर, सचिव गौस मणियार व पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments