Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*कार्य कठीण है,इसलिए करने योग्य है...* *शिक्षणाधिकारी भगवान फुलारी*

 

*कार्य कठीण है,इसलिए करने योग्य है...*
*शिक्षणाधिकारी भगवान फुलारी* 





 निलंगा:-(प्रतिनिधी) लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यातील काही शाळांत 'बाला' (Building As Learning Aid) इमारत-एक शैक्षणिक साधन हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.निलंगा तालुक्यातील साठ शाळांमध्ये हा 'बाला' उपक्रम राबविला जात आहे.बाला उपक्रमात अठ्ठावीस घटकांचा समावेश करण्यात आला आहे व या व्यतिरिक्त नाविण्यपूर्ण घटकाचा समावेश करण्याची मुभा त्या शाळेला देण्यात आली आहे.बाला उपक्रम राबविण्यासाठी ग्राम पंचायतचा निधी,लोकसहभाग घ्यावयाचा आहे.जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून काही शाळांना १२ ते १५ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.निलंगा तालुक्यात निधी मिळालेल्या तीस शाळांच्या मुख्याध्यापकांची आज 'गट साधन केंद्र,निलंगा' येथे कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस लातूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी व उप शिक्षणाधिकारी विशाल दशवंत हे उपस्थित होते.निलंगा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांनी या कार्यशाळेचे प्रास्तविक केले.निलंगा तालुक्यात 'बाला उपक्रमांतर्गत' चालू असलेल्या कामाची माहिती दिली.बाला उपक्रमातील घटकांची अध्ययन निष्पत्तीसोबत सांगड घालावी.या उपक्रमांतर्गत शाळेत जास्तीत जास्त उपक्रम राबवावेत असे मत उप शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी मांडले.'निरीक्षण क्षमतेचा विकास म्हणजे,बाला असे मत शिक्षणाधिकारी (प्राथमिक )भगवान फुलारी यांनी मानले.प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करण्याची सवय बालपणापासूनच मुलांना लावली पाहिजे,तरच त्या मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल.शाळेतील प्रत्येक घटकातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाले पाहिजे,शिक्षण मिळाले पाहिजे,विद्यार्थ्यांचे मन शाळेत रमले पाहिजे यासाठीच बाला उपक्रम सुरु करण्यात आला आहे.शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाले पाहिजे. दारे, खिडक्या, पाण्याची टाकी,किचन शेड, वर्गखोल्या,व्हरांडा या प्रत्येक ठिकाणातून विद्यार्थ्यांना काही ना काही शिकायला मिळायलाच पाहिजे अशा घटकांची निर्मीती आपण 'बाला उपक्रमात' केली पाहिजे असा आग्रह शिक्षणाधिका-यांनी धरला.बाला उपक्रम राबविण्यासाठी निधीची खूप गरज आहे.ग्राम पंचायत,गावातील दानशूर व्यक्ती,शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्यातून, लोकसहभागातून आपण हा 'बाला उपक्रम' राबवावा.


'कार्य कठीण है,इसलिए करने योग्य है...' या वाक्यातून सर्व मुख्याध्यापकांना प्रेरणा देण्याचे कार्य भगवान फुलारी यांनी केले.मिळालेल्या निधीचा योग्य ठिकाणीच व पारदर्शकपणे वापर करावा हे शिक्षणाधिका-यांनी आवर्जून सांगितले.या कार्यशाळेस निलंगा तालुक्यातील तीस शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते.मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून भूतमुगळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव गुंडूरे यांनी आपले मत मांडले.लातूर जिल्हा परिषदेचे स्विकृत सदस्य तथा निलंगा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळूंके यांची या कार्यशाळेस विशेष उपस्थिती होती.बाला उपक्रमासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले व शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.या कार्यशाळेचे सूञसंचालन विषय साधनव्यक्ती अशोक सुरवसे यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी गुरुलिंग स्वामी यांनी मानले.या कार्यशाळेमुळे मुख्याध्यापकांना अनेक नवीन घटकांची माहिती झाली, कल्पनाशक्तीला वाव मिळाला असे अनेक मुख्याध्यापकांनी कार्यशाळा संपल्यानंतर बोलून दाखविले.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गटसमन्वयक /केंद्र प्रमुख कुलकर्णी सर,केंद्र प्रमुख  माचेवाड सर,श्रीमती पुरी मँडम,विषय साधनव्यक्ती सचिन डोईजोडे,अतुल देशमुख,अरुण गायकवाड,वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments