तगरखेडा येथे दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप
निलंगा :( प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना निधी देण्याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात लातूर जिल्हा परिषदेने पहिला नंबर मिळवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील दहा हजार दिव्यांग लाभार्थी यांना साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. लातूर जिल्हा परिषदेने 48 लक्ष रुपये केंद्र सरकार कडे आपले दायित्व या नात्याने निधी वर्ग केला होता.केंद्राने नऊ कोटी 81 लाख रुपयांचे दिव्यांगासाठीचे विविध साहित्यासाठी मंजूर केले होते.माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले.
दिनांक 16 मार्च रोजी निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथे गावातील 9 दिव्यांग लाभार्थ्यांना पंचायत समिती उपसभापती सौ.अंजलीताई बोंडगे, सरपंच केवळाबाई सुर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, चेअरमन रमेश राघो, रमेश थेटे, विवेक स्वामी, बालाजी पाटील, नागेंद्र पाटील, ग्रा. सदस्य मनोज स्वामी व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments