*तांबाळा येथील सीमा आजमवाले हिला 'स्व.देवेंद्र स्वामी कन्यादान योजनेचा लाभ*
निलंगा:-( प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील तगरखेडा गावचे रहिवासी दयानंद मठपती हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तांबाळा येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून ते निलंगा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालकही आहेत.त्यांचे मोठे बंधू स्वर्गीय देवेंद्र वैजनाथ स्वामी (मठपती) यांचे दि.०४/०९/२०१८ रोजी दुःखद निधन झाले.त्यांनी मरणोत्तर नेञदानाचा संकल्प केला होता.त्यांचे दोन लहान बंधू विवेकानंद मठपती (स्वामी),दयानंद मठपती (स्वामी) व स्वामी (मठपती) परिवाराने त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा अशा कठीण परिस्थितीतही निर्णय घेतला. व त्यांचे प्रत्यक्ष नेञदान घडवून आणले.स्व.देवेंद्र स्वामी यांच्या नेञदानामुळे आज सद्यस्थितीत दोन अंधांना दृष्टी मिळाली आहे.पूर्णतः अंध असलेल्या या दोन व्यक्ती हे सुंदर जग पाहत आहेत.'मरावे परि नेञरुपी उरावे' हा संदेश देवेंद्र स्वामी यांनी सत्यात उतरविला आहे.त्यांच्या नेञदानाची प्रेरणा घेऊन लातूर जिल्ह्यातील अनेकांनी नेञदानाचा संकल्प केला आहे.आपल्या मोठ्या भावाची आठवण सदैव समाजात राहावी यासाठी विवेकानंद मठपती (स्वामी) व दयानंद मठपती (स्वामी) यांनी देवेंद्र स्वामी यांच्या स्मरणार्थ 'स्व.देवेंद्र स्वामी कन्यादान योजना' सुरु केली आहे.निलंगा तालुक्यातील तगरखेडा,हालसी (तु.),तांबाळा व तांबाळवाडी या गावात ही योजना सुरु केली आहे.या चार गावातील 'विधवा महिलांच्या मुलीच्या लग्नासाठी,गृहोपयोगी साहित्य घेण्यासाठी ५००० रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे.या आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला 'फुल नाही फुलाची पाकळी' मदत करण्याचा मनोदय मठपती बंधूंनी व्यक्त केला.या योजनेचा शुभारंभ दि.०१/०२/२०२१ रोजी तगरखेडा येथील कु.रुखसार सत्तार तांबोळी हिच्या लग्नाला मदत करुन करण्यात आला. दि.२६/०२/२०२१ रोजी तांबाळवाडी येथील रहिवासी पण सद्या तांबाळा येथे वास्तव्यास असलेल्या कु.सना मन्सूर किरकोळे व कु.फरजाना महताब मोमीन हिला या योजनेचा लाभ देण्यात आला.आज तांबाळा येथीलच कु. सीमा ईस्माईल आजमवाले हिला या योजनेचा लाभ देण्यात आला.लग्नातील गृहोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी ५००० रुपयाची मदत तांबाळ्याचे पोलिस पाटील ओमकार स्वामी,ग्राम सेवक सुरेश पाईकराव,मलिंगराव गोपाळे,शरणप्पा मुळे ,महताब सैदावाले यांच्या हस्ते ही रक्कम देण्यात आली. फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यातच चार मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आला.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अमृत तुमकुटे,मैनोद्दीन सैदावाले,छोटूमियाँ नयाबाडा,नामदेव चोले सर,रोहीदास देवर्षे सर,गौस नयाबाडा,मैनोद्दीन नयाबाडा,ताहेर सैदावाले,सरदार नयाबाडा व दयानंद मठपती हे उपस्थित होते.कु.सीमा ईस्माईल आजमवाले हिची आई ताहेराबी ईस्माईल आजमवाले यांनी 'स्व.देवेंद्र स्वामी कन्यादान योजनेची' रक्कम स्विकारली.यावेळी सलमान ईस्माईल आजमवाले व आजमवाले कुटुंबिय उपस्थित होते. तांबाळ्यातील उपस्थित प्रतिष्ठित नागरिकांनी या योजनेचे खूप कौतुक केले व मठपती (स्वामी) परिवाराचे अभिनंदन केले.


Very nice work
ReplyDelete