*श्री शिवाजी काॅलेज मित्र परिवारातर्फे जिल्हाध्यक्ष शिवाजी निरमनाळे व कार्याध्यक्ष राहूल माशाळकर यांचा सत्कार*
लातूर :- (प्रतिनिधी) माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दिपक कांबळे व राष्ट्रीय महासचिव मा. महेश सारणीकर यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र राज्य महासचिव मा. श्री इद्रिस सिद्दीकी यांच्या शिफारसीने लातूर जिल्हाध्यक्ष पदी शिवाजी निरमनाळे व जिल्हा कार्याध्यक्ष पदी राहूल माशाळकर यांची नियूक्त्ती करण्यात आली आहे. राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येय धोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी शिवाजी निरमनाळे व लातूर कार्याध्यक्ष पदी राहूल ( मारुती) माशाळकर यांची निवड झाल्याबद्दल श्री शिवाजी काॅलेज मित्र परिवारातर्फे या दोघांचाही पूष्पगूच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस काॅन्स्टेबल गजानन साबदे, हेड क्लार्क अजय कूटे, व्यवसायिक दत्ता जाधव, आय. टी.मॅनेजर सुहास राजमाने व सतीश घोटेकर इत्यादी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments