*माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या औसा तालुका अध्यक्ष पदी वसीम शेख यांची निवड*
लातूर :-( प्रतिनिधी) माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दिपक कांबळे व राष्ट्रीय महासचिव मा. महेश सारणीकर यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र राज्य महासचिव मा. श्री इद्रिस सिद्दीकी यांच्या शिफारसीने व लातूर जिल्हाध्यक्ष शिवाजी निरमनाळे यांच्या सहमतीने औसा तालुका अध्यक्ष पदी वसीम शेख यांची नियूक्त्ती करण्यात आली आहे. राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येय धोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
याबद्दल संघटनेच्या मान्यवर कार्यकारणीने मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.


Post a Comment
0 Comments