* तगरखेडा येथे विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात साजरी*
निलंगा :- ( प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथे भारतरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती कोरोना नियमाचे पालन करून उत्साहात साजरी करण्यात आली. झेंडावंदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिमापूजन चेअरमन रमेश राघो यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असलेले सरपंच केवळाबाई सूर्यवंशी व उपसरपंच मदन बिरादर यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील अभंग सूर्यवंशी मा. सरपंच शाहुराज थेटे, ग्रामपंचायत सदस्य शंकर वलांडे,मनोजकुमार स्वामी, कुमार सूर्यवंशी ,दत्तू लंगडे,भगवान सूर्यवंशी, बालाजी थेटे, मधुकर बिरादार, रणजित सुर्यवंशी इत्यादी उपस्थित होते






Post a Comment
0 Comments