*डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी-जि.प.तांबाळा शाळेचा 'जीवनदायी' उपक्रम सुरु.*
निलंगा :-( प्रतिनिधी) लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील काही निवडक शाळांत 'बाला' उपक्रम BALA (Building As Learning Aid) अर्थात इमारत-एक शैक्षणिक साधन हा उपक्रम राबविला जात आहे.निलंगा तालुक्यांतील साठ शाळांमध्ये गट विकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या पुढाकाराने व गट शिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.शाळा इमारतीच्या प्रत्येक घटकांतून मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे हा या उपक्रमाचा हेतू आहे. महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तांबाळा येथे 'बाला उपक्रमांतर्गत' जनावरांसाठी (प्राण्यांसाठी) पाणपोई सुरु करण्यात आली.एका पाणपोईचे उद्घाटन निलंगा तालुक्याच्या सभापती सौ.राधाताई सुरेशराव बिराजदार यांनी केले.तर दुस-या पाणपोईचे उद्घाटन मलिंगराव गोपाळे व उप सरपंच बस्वराज पाटील यांनी केले. याप्रसंगी सभापती पती सुरेशराव बिराजदार,लक्ष्मण ब्रम्हावाले,अमृत तुमकुटे,महारुद्र पसरगे,नागेश बोकछडे,दाऊदसाब सय्यद,अशपाक ठाकूर,अशोक मुळे,मुज्जम्मील मोमीन हे उपस्थित होते.एप्रिल महिना सुरु झाला असून असून उन्हाची तीव्रता वाढली आहे.शेत-शिवारातील पाणी आटले आहे.शेत-शिवारात जनावरे (प्राणी) पाण्यासाठी वण-वण भटकत आहेत.तहानेने व्याकुळ होत आहेत.ही समस्या लक्षात आल्याने मुख्याध्यापक दयानंद मठपती यांना 'जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय' करावी अशी कल्पना सूचली.त्यांनी ही कल्पना आपले मिञ श्री किशोर पोतदार,चिलवंतवाडीकर व श्री प्रकाश काशिनाथअप्पा गस्तगार,औराद (श.) यांना सांगून प्रत्येकी एक हौद या उपक्रमासाठी घेऊन देण्याची विनंती केली.दयानंद मठपती यांच्या विनंतीस मान देऊन चिलवंतवाडीकर ज्वेलर्सचे मालक किशोर पोतदार व कुमार मेडिकल आणि जनरल स्टोअर्सचे मालक प्रकाश काशिनाथअप्पा गस्तगार यांनी तात्काळ होकार देऊन हौद घेऊन दिले.ग्राम पंचायत कार्यालय,तांबाळा यांच्यावतीने मुबलक पाण्याची सोय करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण ब्रम्हावाले,उपाध्यक्ष अमृत तुमकुटे व सर्व सदस्य,श्रीमंत संगनाळे,लक्ष्मण चापाले,नामदेव चोले यांनी परिश्रम घेतले.आणखी दोन ते तीन ठिकाणी अशा पाणपोया बसविणे गरजेचे असून दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आमच्या शाळेस मदत करावी अशी विनंती मुख्याध्यापक दयानंद मठपती यांनी केली.या दोन पाणपोया (हौद) देणारे दानशूर व्यक्ती किशोरजी पोतदार,चिलवंतवाडीकर व प्रकाशजी काशिनाथअप्पा गस्तगार यांचे शाळा व्यवस्थापन समितीने आभार मानले.तांबाळा जि.प.शाळेने राबविलेल्या या 'जीवनदायी उपक्रमाचे' जिल्हाभरात कौतुक होत आहे.





Post a Comment
0 Comments