*जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हिड-१९ मदत केंद्राची स्थापना*
लातूर:(प्रतिनिधी) वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे जिल्हयातील सर्व शासकीय तसेच मान्यताप्राप्त कोव्हिड-19 रुग्णांना बेडची उपलब्ध्ता तसेच बेड उपलब्ध् असलेल्या हॉस्पिटलचे नाव, त्यामध्ये विना ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनसह बेड व व्हेंटीलेटर बेड इत्यादीची माहिती देण्यासाठी व नागरिकांच्या कोव्हिड संदर्भात इतर समस्यांबाबत संपर्क करण्याकरिता 02382-223002 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी फोन करुन माहिती उपलब्ध् करुन घ्याावी. तसेच सदरच्या नियंत्रण कक्षात 24 तास चार कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट मध्ये नेमणूका केलेल्या असून आपणास बेड उपलब्धेबाबत 24 तास माहिती दिली जाईल. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments