*लिंगायत महासंघाच्या'वतीने गजानन येरोळे व अविनाश पाटील यांचा सत्कार*
निलंगा :-( प्रतिनिधी) नुकतेच तंञनिकेतन पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहिर झाला.भारतरत्न लता मंगेशकर पाँलिटेक्निक काॕलेज औराद शहाजानी येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेला गजानन वैजनाथ येरोळे हा सिव्हील विभागात काॕलेज मध्ये 78.29% घेऊन सर्वप्रथम आला.तर याच काॕलेजमध्ये शिकत असलेला अविनाश देविदास पाटील हा द्वितीय वर्षात मेकँनिकल विभागात 77% गुण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद मठपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी लिंगायत महासंघाचे कार्यकर्ते मंगेश हरंगुळे,बस्वराज राघो,महेश वलांडे,अमर बिराजदार व क्रांतीकुमार मठपती हे उपस्थित होते.गजानन येरोळे व अविनाश पाटील हे दोघे तगरखेडा ता.निलंगा येथील रहिवासी असून भारतरत्न लता मंगेशकर पाॕलिटेक्निक काॕलेज औराद शहाजानी येथे शिक्षण घेत आहेत.
अतिशय कठीण परिस्थितीत, मिळेल ते काम करुन त्यांचे शिक्षण चालू आहे.अनंत अडचणींना तोंड देत त्यांनी उज्ज्वल यश संपादित केले आहे.या उत्तुंग यशाबद्दल त्यांचा लिंगायत महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल प्रभात पाटील, सुभाष डावरगावे,लक्ष्मण कांबळे, मुकेश पाटील,विवेकानंद मठपती, अभिमन्यू तिफनबने, ओमप्रकाश जाधव आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.



Post a Comment
0 Comments