*तगरखेड्यात 'लिंगायत महासंघाचे' प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिराजदार*
निलंगा :-(प्रतिनिधी) महात्मा बस्वेश्वर,मन्मथाचा धुम धडाका या चिञपटाचे निर्माता, महात्मा बस्वेश्वरांचे गाढे अभ्यासक तथा 'लिंगायत महासंघाचे' प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिराजदार यांनी 'तगरखेडा ता.निलंगा' येथे भेट दिली.लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री दयानंद मठपती यांच्या घरी प्रा.सुदर्शनराव बिराजदार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वनाथअप्पा स्वामी (सावळे) यांचा श्री बस्वराज राघो,श्री मंगेश हरंगुळे,श्री प्रभातकुमार पाटील यांनी सत्कार केला.श्री अमर बिराजदार, श्री क्रांतीकुमार मठपती यांना प्रा.सुदर्शन बिराजदार सरांनी 'बस्वेश्वर दिनदर्शिका' भेट दिली.महात्मा बस्वेश्वरांचे विचार सर्वांपर्यत पोहचणे आणि ते रुजविणे गरजेचे आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले. सलग दीड तास ते महात्मा बस्वेश्वरांबद्दल बोलत होते.युवकांनी पुढे येऊन समतानायक महात्मा बस्वेश्वरांची वचने (विचार) जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी,रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.




Post a Comment
0 Comments