*सामाजिक बांधिलकी जपून निराधार महिलांना दिला मदतीचा हात*
लातूर :-( प्रतिनिधी/शिवाजी निरमनाळे) लातूर जिल्ह्यातील निराधार महिला भगिणींवर कोरोना ताळेबंदीमुळे उपासमारीची वेळ आली असताना मंगळवारी त्या भगिणींना अन्नधान्य कीटचे वाटप करुन त्या महिलांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सर्वत्र ताळेबंदी घोषीत करण्यात आलेली असताना सामाजिक बांधिलकी दाखवत निराधार महिला भगिणींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सामाजिक उपक्रमातून गरजुंना मदत करण्याची इच्छाशक्ती युवा नेते शंकरभैया श्रृंगारे यांच्या पुढाकारातून होत आहे.ताळेबंदीत पोटाची खळगी भरणे व उदरनिर्वाह करणे शक्य होत नसल्याने त्या महिलांवर उपासमारी ओढवली असून त्यांना मदतीचा हात देऊन दोन महिने पुरेल अशा दर्जेदार अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी त्या निराधार महिला भगिणींकडून खासदार महोदयांचे व युवा नेते शंकरभैयाचे आभार मानण्यात आले.यावेळी निखील गायकवाड,संदेश अण्णा शिंदे,अक्षय धावारे,विजय लांडगे,विशाल कोथिंबीरे,क्षीतीज कांबळे व गणेश सुर्यवंशी आदीजण उपस्थित होते.





Post a Comment
0 Comments