Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*रक्तदात्यांना लसीकरणास थेट प्रवेश.*

 *रक्तदात्यांना लसीकरणास थेट प्रवेश.*







लसीकरण करून स्वतः सुरक्षित रहा; 

रक्तदान करून इतरांना सुरक्षित करा.


लातूर :-( प्रतिनिधी)  शहरातील जे नागरिक रक्तदान करतील अशा नागरिकांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्याचा लातूर मनपा चा मानस आहे. यासाठी शहरातील कोणत्याही ब्लड बँक मध्ये नागरिकांनी रक्तदान करावे. लसीकरण केंद्र येथे रक्तदाता कार्ड दाखविल्यास या रक्तदात्यांना थेट प्रवेश मिळेल.

लसीचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तसेच १ मे पासून १८ वर्ष पेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना लस देण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्र येथे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी रक्तदाता कार्ड दाखवून रांगेत उभे राहावे लागणार नाही, त्यांना लसीकरण केंद्रात प्राधान्याने प्रवेश मिळवता येईल.

 लस घेतल्यानंतर पुढील २ महिने रक्तदान करता येत नाही त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू शकतो. म्हणून रक्तसाठा संकलित करण्यासाठी या प्रोत्साहनपर मोहिमेत लातूरकर सहभागी होतील याची मला खात्री आहे.असे प्रतिपादन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments