Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*"पक्ष्यांसाठी पाणपोई" दयानंद मठपती यांचा जीवनदायी उपक्रम*

 *"पक्ष्यांसाठी पाणपोई" दयानंद मठपती यांचा जीवनदायी उपक्रम*



निलंगा :-( प्रतिनिधी ) कडक उन्हाळा सुरु झाला असून,पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची भटकंती सुरु झाली आहे...रान-शिवारात पाणी नाही..ओढे-नाले कोरडे पडले आहेत.. अशा परिस्थितीत पाण्यासाठी 'पक्ष्यांची' ओढ गावाकडे लागली आहे.थव्यांच्या थवे गावात येत आहेत.हे लक्षात आल्यामुळे तगरखेडा येथील अमर बिराजदार, शिवाजी थेटे,अविनाश पाटील,योगेश बेलूरे,विश्वंभर मुळजे,गजानन येरोळे व दयानंद मठपती यांनी तगरखेडा येथे 'पक्ष्यांची पाणपोई' सुरु केली आहे.महादेव मंदिर,अमीर टेलर यांच्या दुकानासमोर व डाँ.के.एस.मठपती यांच्या घरासमोर या छोट्या-छोट्या ५ पाणपोया बसविण्यात आल्या आहेत..तगरखेडा येथेआणखी २०-२५ पाणपोया वेगवेगळ्या ठिकाणी बसविण्याचे (ठेवण्याचे) नियोजन करण्यात आले आहे.खूप तहानलेल्यांना घोटभर पाणीही जीवनदान देऊ शकते... या उद्देशाने या पाणपोया सुरु करण्यात आल्या आहेत.तगखेडा येथील दयानंद मठपती हे प्रत्येक महिण्यात एखादा तरी नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम आपल्या मिञांच्या सहकार्याने राबवित असतात.





Post a Comment

0 Comments