Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*केंद्रीय मंत्री ना.गडकरी साहेब यांचे कल्पकतेमुळे व माजी मंत्री,आ.निलंगेकर साहेबांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे बोरसुरी साठवण तलावास मंजूरी*

 *केंद्रीय मंत्री ना.गडकरी साहेब यांचे कल्पकतेमुळे व माजी मंत्री,आ.निलंगेकर साहेबांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे  बोरसुरी साठवण तलावास मंजूरी*



*---------------------------------------*

🔹 *४५ ते ४७ कोटी रु. निधीतून ९५.१२ हे. जमीनीवर उभारणार बोरसुरी साठवण प्रकल्प* 

*-----------------------------------------*

🔹 *तब्बल ४५० ते ५०० हे.क्षेत्र ओलिताखाली येणार*

*----------------------------------------*

🔹 *बोरसुरी दाळीची उतराई बोरसुरी साठवण तलावाने...*


निलंगा :(प्रतिनिधी)निलंगा तालुक्यातील मौजे बोरसुरी गाव हे बोरसुरी दाळीकरीता प्रसिद्ध आहे.विशेष करून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय संभाजीराव पाटील-निलंगेकर साहेब यांचे मतदार संघात येते. त्यात आ.निलंगेकर साहेब आणि बोरसुरी दाळ म्हंटले की, प्रत्येकांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद निर्माण करणारा असतो.कारण या भागात हाजारो कार्यकर्त्यासोबत हमखासपणे ज्वारीच्या भाकरीसोबत बोरसुरी दाळीची मनमुरादपणे अस्वाद घेताना आदरणीय भैय्यासाहेबांना आनेक वेळा पाहण्यात आलेले आहे.पण आता बोरसुरी दाळी ऐवजी बोरसुरी साठवण तलाव अशीही वेगळी ओळख निर्माण होणार आहे.ना.नितीनजी गडकरी साहेब यांचे कल्पकतेतून विशेष बाब म्हणून बळीराजा जलसंजवनी योजनेंतर्गत समाविष्ट प्रकल्प म्हणून बोरसुरी साठवण तलावाच्या भुसंपादन व उर्वरित बांधाकामाकरीता एकुण ४५ ते ४७ कोटी रु मंजूर झाले असून.याकरीता जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील-निलंगेकर साहेब यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे या तलावास मंजूरी देण्यात आली आहे.खरेतर आ.निलंगेकर साहेबांनी बोरसुरी दाळीची एकप्रकारची उतराईच या साठवण तलावाने केली असल्याचे दिसुन येते. या साठवण तलावात तब्बल ३.६८१ दलघमी पाणीसाठा निर्माण होणार आहे. तर या साठवण तलावामुळे मौजे बोरसुरी, टाकळी, चिलवंतवाडी, कलमुगळी, चांदुरी व चांदुरीवाडी या परीसरातील बोर व विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दुर होणार आहे. तसेच या चार गावच्या ४५३ शेतकऱ्यांच्या ४५० ते ५०० हेक्टर सिंचनास याचा लाभ होणार आहे.सदर साठवण तलाव प्रकल्प हा एकुण ९५.१२ हे जमीनीवर उभारण्यात येणार आहे.सदरील तलावाचे काम जुन ०२१ अखेर पुर्ण करण्याच्या नियोजनात दिसुन येत आहे. 



या महत्वपूर्ण तलावामुळे पंचक्रोशीतील शेतकरी बांधवाकडुन आ.निलंगेकर साहेबांचे आभार मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments