*रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत व व्यापार करण्यासाठी लाॅकडाऊन मधून अंशतः सूट देणेबाबत नायब तहसीलदारांना दिले निवेदन*
निलंगा :-( प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यामध्ये कोरोणा रुग्णांना कोरोनावर प्रभावी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून देणे व निलंगा तालुक्यातील सर्व व्यापारी दुकानदारांना व्यापार करण्यासाठी लॉकडाऊन मधून अंशतः सूट देणेबाबत नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
रेमडेसिवीर इंजेक्शन सर्वसामान्यांना गरजेनुसार मिळावे या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी.
आणि त्याचबरोबर लॉकडाऊन मध्ये आठवड्यातून तीन ते चार दिवस व्यापारी दुकानदारांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी.
अशा विनंतीचे निवेदन लोकनेते आ.श्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब व युवा नेते श्री अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज दिनांक 8 एप्रिल 2021 रोजी तहसील कार्यालय निलंगा येथे नायब तहसीलदार श्री महापुरे साहेब यांना देण्यात आले .
यावेळी श्री शाहूराज थेटे तालुकाध्यक्ष भाजप निलंगा , श्री वीरभद्र स्वामी शहराध्यक्ष भाजप निलंगा , श्री युवराज पवार सरचिटणीस भाजप निलंगा , श्री बाळासाहेब पाटील तालुकाध्यक्ष भाजप युवा मोर्चा निलंगा , श्री सुमित इनानी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष निलंगा , श्री अशोक वाडीकर सरपंच गुराळ , श्री मनोज कोळे उपाध्यक्ष न. प. निलंगा ,श्री उमेश उमापुरे जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा इ.उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments