*अवकाळी पावसात विज पडून आजी नातीचा मृत्यु*
निलंंगा
याबाबत सविस्तर माहिती अशी की सदरील घटना आज दुपारी ४ वाजायच्या दरम्यान घडली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून कासारबालकुंदा तांबाळा मदनसुरी हालशी हत्तरगा हासुरी या भागात मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केले असून यात माणसे व पशुधन विज पडून दगावले. वारंवार याच भागात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाबरोबर माणसांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. विज पडून माणसे दगावली आहेत परंतु त्यांच्या वारसांना तात्काळ मदत प्रशासनाकडून मिळत नाही. अशा नुकसानग्रस्त कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी जनतेतून होत आहे. गेल्या महिनाभरापासून १८ जणावरे विज पडून दगावली आहेत त्यांनाही मदत लवकर द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ही घटना कळताच गावचे सरपंच नसरुद्दीन पटेल यांनी तात्काळ तलाठी व पोलीस स्टेशनला माहिती देऊन पंचनामा करून वीज पडून मरण पावलेल्या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी केली आहे. तलाठी निळकंठ ननवरे हयांनी घडलेल्या घटनेचा अहवाल तयार केला असून कासार शिरसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Post a Comment
0 Comments