*पंतप्रधान नरेंद्र मोदींजीच्या नेतृत्वात केंद्रीय सत्ता स्थापनेची सात वर्षपूर्ती निमित्त वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका व कोरोना योद्धे यांचा सत्कार*
निलंगा :-( प्रतिनिधी)
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रीय सत्ता स्थापनेला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 30 मे या दिवशी हलगरा व औराद येथे वैद्यकीय अधिकारी,आशा वर्कर आणि कोरोना योध्यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संपूर्ण भारत एकजूट होऊन कोरोना महामारीशी लढत आहे अशा कठीण परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका आशा वर्कर्स,कोरोना योद्धे समाज आणि समाजातील लोकांसाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनीय आहे.यांच्या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. यांच्या धैर्याला आणि सेवाकार्याला भाजपा जनता पार्टीच्या वतीने सलाम.यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.यांच्या कार्याबद्दल फूल नाही फुलांची पाकळी या स्वरुपात छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र हलगरा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अबीद शेख, डॉ.अझरोद्दीन ढालाईत, हुडगे एस.एल, मेघा शिंदे,येळीकर आर.एस, मुंजाळ ए. बी, काळे बी.एम, तांबाळे ए. बी, सुरवसे व्ही. जी, संतराम, सदानंद सावरे, पोतराजे, अमोल पांचाळ, रमेश डोवळे,आशा ताईं सुनिता जाधव, हलगरकर, जोशी, मसलगे, पंडे , लंगडे,टोंपे व पत्रकार शिवाजी निरमनाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्री.शाहुराज थेटे, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री.दुष्यंत अप्पा सगरे, लातूर जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस श्री.तानाजी बिरादार, हलगरा उपसरपंच श्री.अमृत बसवदे ,भाजपा.अ.जा.मोर्चा.भाजपाअ.जा.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजय हलगरकर, अभिषेक हलगरकर,श्री.मोहन कुलकर्णी, श्री.धनाजी सगरे, श्री.मारूती मुगळे, श्री.शांतेश्वर हुसुरे, श्री.संदीप पिचरूटे, श्री.बालाजी सावरे,श्री.शिवाजी पंडे,आदी उपस्थित होते.
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र औराद शहाजनी येथील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका, आशाताईं वर्कर, कर्मचारी यांचा सत्कार पंचायत समितीचे उपसभापती अंजलीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, शहराध्यक्ष राजा पाटील,तालूका उपाध्यक्ष शिवपूत्र आंग्रे, रज्जाक रकसाळे, भगवान लड्डा, इर्शाद पटेल,चंदू शंकद,विजय कुमार मुळे, अमोल सूर्यवंशी, वजीर पठाण, संदीप पंचाक्षरे, शंकर बिरादार इ. उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments