*तगरखेडा येथे अभिनव उपक्रमाने वाढदिवस साजरा*
निलंगा :-( प्रतिनिधी)
निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील 'एकच ध्यास गावचा विकास' हा वसा घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे उमदे नेतृत्व गावचे उपसरपंच श्री मदन अशोकराव बिरादार आणि सौ. भाग्यश्री मंगेश हरंगुळे यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्त दोघांचाही वाढदिवस अनिभव उपक्रमाने साजरा करण्यात आला.
*उपसरपंच मदन बिरादार यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवारातर्फे १००१सॅनिटायझर व कोरोना जनजागृती परिपत्रकाचे वाटप*
उपसरपंच मदन बिरादार यांच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराकडून गावातील घरोघरी १००१ सॅनिटायझर आणि कोरोना संदर्भातील जनजागृतीपरिपत्रकाचे वाटप करण्यात आले. सदरील पत्रकाच्या माध्यमातून प्रत्येकाने स्वतःसह आपले कुटुंब आणि गाव कोरोनामुक्त व्हावे म्हणून वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, कोरोनाची लक्षणे जाणवल्यास लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणे, घरीच राहा सुरक्षित राहा, आदी महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
*सौ.भाग्यश्री हरंगुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण*
पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे, हे ओळखून मंगेश हरंगुळे यांनी आपल्या धर्मपत्नी सौ.भाग्यश्री यांचा २९ वा वाढदिवस हा वृक्षारोपण करून साजरा केला. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मैदान, मुस्लिम आणि लिंगायत स्मशानभूमीत वड, पिंपळ,चिंच, करवंदी,जांभूळ अशा विविध वृक्षांचे रोपण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वृक्षरोपणाचे जतन आणि संवर्धनाची जबाबदारी गावातील तरुण वर्गाने घेतली.
आज घडीला वाढदिवसानिमित्त केल्या जाणाऱ्या अवाढव्य खर्चाला फाटा देवून या दोघांनीही एक चांगला प्रेरणादायी उपक्रम राबविल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी गावचे सरपंच श्रीमती केवळाबाई सूर्यवंशी, माजी सरपंच प्रकाशजी स्वामी, सोसायटीचे विद्यमान चेअरमन रमेशप्पा राघो, कृ.उ.बा.समितीचे उपसभापती लक्ष्मणजी कांबळे, माजी चेअरमन आणि ग्रामपंचायत सदस्य सुभाष डावरगावे,पोलीस पाटील अभंग सूर्यवंशी, ग्रामपंचायतचे सदस्य शंकर वलांडे, मनोजकुमार स्वामी, तलाठी कैंचेसाहेब,डॉ.शरश्चंद्र मठपती, संगमनाथ उडबळे, बस्वराज पाटील, सुरेश मुळजे,संजय थेटे, रणजित सुर्यवंशी मित्रपरिवार आणि गावातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्ही तगरखेडकर, चांदनी चौक मित्र परिवारातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.






Post a Comment
0 Comments