Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांची पुण्यतिथी व अमोल ढोरसिंगे यांचा जन्मदिवस अन्नधान्य किट वाटप करुन साजरा करण्यात आला*

 स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांची पुण्यतिथी व अमोल ढोरसिंगे यांचा जन्मदिवस अन्नधान्य किट वाटप करुन साजरा करण्यात आला.




औराद शहाजानी :-( प्रतिनिधी)


            धाराशिव जिल्ह्यातील खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडिल स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांची पुण्यतिथी व दैनिक सामनाचे येथील प्रतिनिधी अमोल ढोरसिंगे यांचा जन्मदिवस हा व्यर्थ खर्च टाळुन गोर गरीब जनतेला कोरोनाच्या परीस्थितीत मदत म्हणुन अन्नधान्य किट वाटप करुन साजरा करण्यात आला.

        आज सध्या कोरोनाची परीस्थीती असल्याने अनेक गोरगरिबांना अर्थिक टंचाई जाणवत असल्याचे लक्षात घेऊन खासदार ओमराजे यांचे कट्टर समर्थक वसिम मुजावर यांनी स्वर्गीय पवनराजे यांची पुण्यतिथी एक आगळ्यावेगळ्या सामाजिक पध्दतीने साजरी करण्याचे ठरवुन अमोल ढोरसिंगे यांचे संपर्क साधल्यानंतर त्यांनी समर्थन दिल्याने आणी आज योगायोगाने त्यांचा जन्मदिवस असल्यामुळे त्यांनीही व्यर्थ खर्च टाळुन आज येथील बसस्थानकात स्वर्गीय पवनराजे यांच्या प्रतीमेचे पुजन करुन तीस ते पस्तीस कुटुंबातील लोकांना अन्नधान्य किट तयार करुन वाटप करण्यात आले.

         यावेळी वसिम मुजावर , अमोल ढोरसिंगे , राहुल सांडवे , विष्णु गवळी , अजय सोळुंके , सलमान पठाण , भगवान जाधव , देवेंद्र भंडारे , आगार व्यवस्थापक थेटे , गौस बागवान , संभाजी जावळे व गावातील नागरीकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments