*तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत तगरखेडा व्हाॅलीबाॅल संघाने पटकाविला द्वितीय क्रमांक*
निलंगा :-( प्रतिनिधी)
निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथे नेहरू युवा केंद्र लातूर द्वारा आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तगरखेडा व्हाॅलीबाॅल संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
व्हाॅलीबाॅल स्पर्धेमध्ये अंतिम सामना यशवंती निलंगा विरूद्ध साहारा स्पोर्ट्स संघात झाला. या अतितटीच्या लढतीत यशवंती निलंगा संघ प्रथम क्रमांक मिळविला तर तगरखेडा संघानेे द्वितीय क्रमांक पटकाविला.या संघांचे प्रशिक्षक दिपक पाटील हे होते.
या संघात बालाजी गुत्ते, पृथ्वीराज पाटील, संतोष बोरसुरे, शिवशंकर कल्याणे, श्रीकांत बेलूरे, समीर शेख, मुक्रम मत्तीशे ,ऋतूराज पाटील, प्रसाद डावरगावे, प्रमोद निरमनाळे, विनायक उडबळे, योगेश बेलूरे हे खेळाडू होते. खेळाडूंचे आम्ही तगरखेडकर ग्रूप तर्फे कौतुक अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment
0 Comments