Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रिसेप्शनला फाटा देत जिल्हा परिषद शाळेस २५ हजार रुपयाची मदत*

 


*रिसेप्शनला फाटा देत जिल्हा परिषद शाळेस २५ हजार रुपयाची मदत* 

 *मठपती परिवाराचा स्तुत्य उपक्रम*

निलंगा :-( प्रतिनिधी)

 तगरखेडचे सुपुत्र विश्वनाथ सिद्दय्या मठपती हे सेवानिवृत्त कर्मचारी सद्या परळी येथे वास्तव्यास आहेत.विश्वनाथ व चंपाबाई मठपती यांचे नातू व डॉ.शरदचंद्र मठपती व कै.ज्योती मठपती यांचे चिरंजीव राजहंस व वैभवी यांचा शुभ विवाह २६ डिसेंबर २०२१ रोजी परळी येथे थाटामाटात संपन्न झाला.लग्नानंतर नातेवाईक व गावक-यांना स्नेहभोजन देण्याची ग्रामीण भागात पध्दत आहे.पण या परंपरेला फाटा देत दिनांक ७ जानेवारी रोजी मठपती परिवाराने तगरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रंथालय तयार करण्यासाठी  २५००० रुपयाची मदत केली.

गावातील मुलांना,तरुणांना वाचनाची गोडी लागावी, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करता यावा. तरुण मूलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी  ही मदत उपयुक्त ठरेल.जिल्हा परिषद शाळेत सुसज्ज वअद्यावत अभ्यासिका बनवण्यासाठी सदरील निधीचा वापर केला जाईल असे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सरपंच उपसरपंच यांनी सांगितले.याप्रसंगी उपसरपंच मदन बिरादार,रणजित सुर्यवंशी, प्रकाश स्वामी,व्यंकटराव बिरादार,माधव बेलूरे,संगमनाथ उडबळे,सुरेश डावरगावे,विवेकानंद मठपती,प्रभात पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments